कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ करण्याची प्रवासी संघाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ करण्याची प्रवासी संघाची मागणी
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ करण्याची प्रवासी संघाची मागणी

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ करण्याची प्रवासी संघाची मागणी

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ आणि १७ वरील प्रवासादरम्यान टोलमाफी मिळावी, अशी मागणी ठाणे कोकण रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १६४० किमी असलेला ६६ क्रमांकाचा महामार्ग मुंबईला तमिळनाडूमधील कन्याकुमारी शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी अशी महत्त्वाची शहरे याच राष्ट्रीय महामार्गाला लागून आहेत. याच महामार्गाने कोकणातील तिन्ही जिल्हे जोडले जातात. जुना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ आणि ६६ रस्तेमार्गे कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना आपलासा झाला आहे. गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात चाकरमानी खासगी वाहने आणि बसने महामार्गावरून प्रवास करत असतात, परंतु ठाणे ते सावंतवाडीदरम्यान तब्बल सहा टोल नाके असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे टोल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात रस्ते मार्गे कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील टोल वगळावेत यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे, असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ अध्यक्ष सुजित लोंढे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06647 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top