पर्यावरणपूरक आयटीसी हॉटेल्सला जागतिक मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक आयटीसी हॉटेल्सला जागतिक मानांकन
पर्यावरणपूरक आयटीसी हॉटेल्सला जागतिक मानांकन

पर्यावरणपूरक आयटीसी हॉटेल्सला जागतिक मानांकन

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ ः प्लास्टिक बंदी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छ ऊर्जेवर भर आदी पर्यावरण जपणुकीचे उपाय योजणाऱ्या आयटीसी हॉटेल शृंखलेच्या देशातील अनेक हॉटेलांना झीरो कार्बन सर्टिफाईड हॉटेल, तसेच प्लॅटिनम सर्टिफाईड हॉटेल आदी सन्मान मिळाले आहेत.

परळच्या आयटीसी ग्रँड सेंट्रलसह देशातील आयटीसीच्या सर्वच हॉटेलांमध्ये काचेच्या साहित्याचा वापर, कचऱ्याचे वर्गीकरण आदी उपाय केले जात असून यापुढेही अशाच उपायांवर भर दिला जाईल, असा त्यांचा निर्धार आहे. याबद्दल आयटीसीच्या बंगलोर, चेन्नई येथील हॉटेलांना यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचा पुरस्कार मिळाला आहे; तर सोनार हॉटेलला अशाच पर्यावरणपूरक उपायांबद्दल कार्बन क्रेडिटही मिळाले आहे. ग्रीन बिल्डिंग डिझाईनने बांधलेल्या या हॉटेलांमध्ये २० टक्के ऊर्जाबचतीसाठी इन्फ्रारेड पद्धतही वापरली जाते. ‘जबाबदारीने चैन करा’ या तत्त्वानुसार आरोग्य, स्वच्छता व सुरक्षेचे सर्वोच्च संकेत व नियम हॉटेलांमध्ये पाळले जातात. त्याबद्दल प्लॅटिनम सर्टिफिकेट मिळणारी जगातील पहिलीच हॉटेल शृंखला असल्याचे आयटीसीचे विभागीय मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल छड्डा म्हणाले.

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया
हॉटेलांमधील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोमिथेन प्लांट चालवले जातात; तर गेली पाच वर्षे पाण्यावर प्रक्रिया करून फेरवापर केल्याने पाण्याची मागणी ५० टक्के कमी झाली आहे. हॉटेलांमधील ४० टक्के अन्नपदार्थ स्थानिक बाजारपेठांमधून घेतले जातात; तर विजेपैकी ५७ टक्के वीज ही सौरऊर्जेसह स्वच्छ स्रोतांमधून मिळवली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06656 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top