देशी झाडेच बेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशी झाडेच बेस्ट
देशी झाडेच बेस्ट

देशी झाडेच बेस्ट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईत वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसह निसर्गाची विविधांगी रूपे मुंबईचे सौंदर्य खुलवतात. अनेक परदेशी झाडांचा बहर येथे बघायला मिळतो; मात्र पावसात परदेशी झाडे कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईत आता केवळ देशी म्हणजेच स्थानिक झाडे लावण्यात येणार आहेत.
मुंबई शहर समुद्रसपाटीपासून अवघ्या चौदा मीटर उंचीवर आहे. मुंबईत पाऊस पडण्याचे आणि पाणी साचण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ अशा नैसर्गिक समस्यांचा धोका सातत्याने मुंबईवर असतो. याचा फटका मुंबईतील झाडांनाही बसत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात शेकडो झाड उन्मळून पडत असतात. अनेकदा आर्थिक नुकसान तसेच नागरिकांना दुखापतीदेखील होतात.
मागच्या ४ वर्षांत एकूण ३४६९ झाडे उन्मळून पडली. त्यापैकी पालिकेची १,०३८ आणि खासगी सोसायटीच्या आवारातील २,४३८ झाडांचा त्‍यात समावेश होता. त्‍यामुळे वृक्षारोपण करताना स्‍थानिक प्रजातींची व मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल, अशी झाडे लावणे आवश्यक आहे. इतर प्रजातींची झाडे लावल्‍यास ती मुंबईच्‍या मातीमध्‍ये घट्टपणे मूळ धरत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन वृक्षप्राधिकरणाने स्‍थानिक प्रजातींची झाडे लावण्‍याच्‍या धोरणास गेल्या वर्षी मंजुरी दिली आहे. येत्या पावसाळ्यात १ लाख केवळ स्थानिक प्रजाती लावण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले आहे.

‘ही’ झाडे लावण्यावर भर
वड, पिंपळ, उंबर, कांचन, कदंब, गुंज, पळस, निम, महोगनी, मोह, बहावा, साग, अर्जुन, ऐन, किंजळ, सीता अशोक, उंडल, नागकेशर, चंपा, शिवन, शिरीष, करंज, बकुळ, बेल, तामण, हिरडा, बेहडा, नारळ, आवळा, खैर, तेतू, आंबा, पुत्रंजीवा, जंगली बदाम, बिब्‍बा, पारिजातक, रिठा, चंदन, कुंभ, फणस, चाफा.

पालिकेने मंजूर केलेल्‍या धोरणानुसार ४१ स्‍थानिक प्रजातींच्‍या समावेश करण्‍यात आला आहे. ही यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईतील नागरिक सोसायटीच्या आवारातदेखील या झाडांची लागवड करू शकतात.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06663 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top