राज्‍याची कोरोना चिंता वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्‍याची कोरोना चिंता वाढली
राज्‍याची कोरोना चिंता वाढली

राज्‍याची कोरोना चिंता वाढली

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येने राज्याची चिंता वाढली असून शनिवारी दिवसभरात १,३५७ बाधित आढळले. राज्यातील कोविड रुग्णांची एकूण संख्या ७८,९१,७०३ वर गेली आहे. मुंबईतही रुग्ण वाढत असून ८८९ नवीन बाधितांची नोंद झाली. कोरोनाच्या चौथ्या लाटेने पाय पसरण्यास सुरुवात केल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शनिवारी राज्यभरात कोरोनावर उपचार घेणाऱ्या ५९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण ७७,३७,९५० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आताही ९८.०७ टक्क्यांवर कायम आहे. राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५,८८८ वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत ८ कोटी १० लाख ३५ हजार २७६ नमुन्यांची तपासणी केली गेली. त्यापैकी केवळ ७८ लाख ९१ हजार ७०३ रुग्णांमध्ये कोरोना संसर्ग आढळला. राज्यात कोरोनाचे पॉझिटिव्हिटीचे प्रमाण केवळ ९.७४ टक्केच असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात शनिवारी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या १,४७,८६५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्‍के एवढा आहे.

मुंबईत ८८९ नवीन रुग्णांची नोंद
मुंबईत शनिवारी दिवसभरात तब्बल ८८९ कोरोना रुग्ण आढळले. मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या १०,६८,८९७ वर पोहोचली आहे. दिवसभरात एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५६८ वर पोहोचली आहे. दिवसभरात ३२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या ४,२९४ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06669 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top