म्हाडाच्या १४२ दुकानांचा लवकरच आॅनलाई लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाच्या १४२ दुकानांचा लवकरच आॅनलाई लिलाव
म्हाडाच्या १४२ दुकानांचा लवकरच आॅनलाई लिलाव

म्हाडाच्या १४२ दुकानांचा लवकरच आॅनलाई लिलाव

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : म्हाडाचे मुंबई मंडळ शहर आणि उपनगरातील दुकानांची विक्री करण्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. १४२ दुकानांच्या ऑनलाईन लिलावासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत. जूनच्या अखेरीस जाहिरात प्रसिद्ध होईल, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये व्यावसायिक गाळे उभारते. त्यांचा ई-निविदा पद्धतीने लिलाव करण्यात येतो. यापूर्वी मंडळाने काढलेल्या दुकानांच्या जाहिरातीला अर्जदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर कोरोनामुळे दुकानांची जाहिरात मंडळाला काढता आली नाही. कोरोनाचे सावट दूर होताच मंडळाने सायन प्रतीक्षा नगर आणि मालाडमधील दुकानांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४२ दुकानांची लवकरच जाहिरात काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुकानांची सोडत ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुंबई मंडळातील अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06676 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top