शस्त्रक्रियेपूर्वी कोविड चाचणी अनिवार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शस्त्रक्रियेपूर्वी कोविड चाचणी अनिवार्य
शस्त्रक्रियेपूर्वी कोविड चाचणी अनिवार्य

शस्त्रक्रियेपूर्वी कोविड चाचणी अनिवार्य

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः सध्या कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. रुग्ण लक्षणरहित असून गंभीर स्थितीपर्यंत जाण्याचे प्रमाण कमी असले तरी सावधगिरीची पावले उचलली जात आहेत. यात मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयांपैकी पालिकेच्या केईएम रुग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रियेपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य असल्याचे पत्रक जारी केले आहे. तसेच केईएम रुग्णालय परिसरात येणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.
अद्याप कोरोना पूर्णतः गेला नसून रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंता वाढवत आहे. अशात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. रुग्णालयासारख्या परिसरात जातानादेखील मास्क वापरणे आवश्यक आहे; मात्र बहुतांश नागरिक मास्कचा वापर टाळतात. अशा वेळी केईएम रुग्णालय प्रशासनाचे सूचना पत्रकच जारी केले आहे. दरम्‍यान, राज्यात एक हजारहून अधिक रुग्णसंख्या दररोज नोंदवली जात असून यापैकी सातशेच्या घरात एकट्या मुंबईत रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. त्यामुळे मास्क आणि लसीकरण मोहिमेला महत्त्‍व दिले जात असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. शिवाय राज्याचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनीदेखील यापूर्वी परिपत्रक काढून एकूण चाचण्यांपैकी आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण किमान ६० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवण्याचे सूचित केले आहे.

राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्या सतत वाढत आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णालयाच्या आवारात मास्क वापरणे अनिवार्य केले असल्याचे पत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
- डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06678 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top