शाळा नियोजित वेळेतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा नियोजित वेळेतच
शाळा नियोजित वेळेतच

शाळा नियोजित वेळेतच

sakal_logo
By

शाळा नियोजित वेळेतच
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई, ता. ५ : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी शाळा मात्र नियोजित वेळेत १३ जून रोजीच सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच आवश्यकता पडल्यास कोरोनाच्या नियमासंदर्भात टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
कोरोनामुळे मागील दोन वर्षे खूप मोठ्या प्रमाणात शाळा बंद होत्या, त्यामुळे काही प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेले आहे. यंदा ते नुकसान टाळण्यासाठी १३ जून या शाळेच्या पहिल्या दिवसापासून विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू केल्या जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात शाळा सुरू होण्यासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी उरला असतानाच कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने काही पालकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेत मास्‍क सक्‍तीबाबत अद्याप निर्णय नाही
वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे महत्त्वाच्या ठिकाणी सरकारकडून मास्क लावण्याची सक्ती केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विचारले असता वर्षा गायकवाड म्हणाल्या, की तूर्तास आम्ही शालेय विद्यार्थ्यांना मास्क लावण्याची सक्ती करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही; मात्र परिस्थिती लक्षात घेऊन त्यासाठी काही नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. शिवाय शालेय विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंदर्भातदेखील काही विषय उपस्थित झाल्यास राज्य टास्क फोर्ससोबत चर्चा करून त्यासंदर्भात असलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी पालकांनी योग्य ती काळजी घेऊन मुलांना शाळेत पाठवले पाहिजे. मागील वर्षी खूप मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी शाळांमध्ये मुलांना पाठवण्याचे आवाहन आम्ही पालकांना करत आहोत.
- प्रसाद तुळसकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ

मुंबई आणि परिसरात सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये जात असलेल्या मुलांना पहिल्यांदाच शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे आम्ही स्वागतच करतो; मात्र सध्याच्या परिस्थितीत कोरोना आणि त्यांदर्भात जी भीती आहे, त्यावर आणखी काही काळजी घेऊन या शाळा सुरू कराव्यात.
- प्रवीण यादव, अध्यक्ष, फुले शाहू आंबेडकरी पालक विद्यार्थी संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06683 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top