
मुंबईत ८ जूनपासून पाऊस?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईसह परिसरात ८ जूनपासून पावसाला सुरुवात होऊ शकते. त्यानंतर आठवडाभराने मुंबईत मान्सून दाखल होईल, असा अंदाज ‘मुंबई वेदर’ या खासगी संस्थेने वर्तवला आहे.
केरळमध्ये २९ मे रोजी मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यानंतर आठवडाभरात मुंबईत मान्सून दाखल होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप मुंबईत पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मुंबईत नेमके पावसाचे आगमन कधी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘मुंबई वेदर’च्या अंदाजानुसार मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात ८ ते ९ जूनपासून पावसाला सुरुवात होऊ शकते. काही दिवस पाऊस कोसळल्यानंतर साधारणतः १३-१५ जूनच्या सुमारास मान्सून सुरू होऊन पावसाची तीव्रता हळूहळू वाढेल. यानंतर खऱ्या अर्थाने मुंबईत पाऊस दाखल होईल, असे ‘मुंबई वेदर’ने म्हटले आहे.
.......
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06691 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..