न्यायमूर्ती पदभरतीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायमूर्ती पदभरतीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
न्यायमूर्ती पदभरतीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

न्यायमूर्ती पदभरतीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : उच्च न्यायालयात रिक्त असलेल्या न्यायमूर्ती पदांची भरती करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. त्यामुळे अन्य खंडपीठापुढे आता त्यावर सुनावणी होईल.

बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्या वतीने ॲड. एकनाथ ढोकळे यांनी ही याचिका दाखल केली होती. मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, मुख्य न्या. दत्ता हे उच्च न्यायालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत आणि न्यायमूर्ती नियुक्तीची शिफारस करणाऱ्या कॉलेजियम मंडळामध्ये आहेत. उच्च न्यायालयाची मंजूर पदसंख्या ९४ आहे. मात्र सध्या ५७ न्यायमूर्ती नियुक्त आहेत. केंद्र सरकारने तातडीने ही रिक्त पदे भरावीत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06698 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top