सलमान खानच्या सुरक्षेचा मुंबई पोलिसांकडून आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलमान खानच्या सुरक्षेचा मुंबई पोलिसांकडून आढावा
सलमान खानच्या सुरक्षेचा मुंबई पोलिसांकडून आढावा

सलमान खानच्या सुरक्षेचा मुंबई पोलिसांकडून आढावा

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : सिद्धू मूसेवालाप्रमाणे बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यावर मुंबई पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला आहे. वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सलमान खानच्या घरी येत त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला; तसेच सलमान खानचा जबाबही नोंदवला.
सलमान खानचे वडील सलीम खान यांना रविवारी (ता. ५) सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान धमकीचे पत्र मिळाले होते. तुमचा ‘सिद्धू मूसेवाला करणार’ असल्याची धमकी त्या पत्रात दिली. या पत्रानंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. त्यानुसार आज सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक सलमान खानच्या घरी पोहोचले. सलमान खानची सुरक्षा वाढवण्यासंदर्भात पोलिस प्रशासन विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्यासह एकूण चार जणांचे जबाब नोंदवले आहेत.
---
२०० सीसी टीव्हींची तपासणी
सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी २०० हून अधिक सीसी टीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची एकूण १० पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06699 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top