सचिन वाझे माफिचा साक्षीदार होणार न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन वाझे माफिचा साक्षीदार होणार न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण
सचिन वाझे माफिचा साक्षीदार होणार न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण

सचिन वाझे माफिचा साक्षीदार होणार न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील खंडणीवसुलीच्या खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेच्या मागणीवरील कायदेशीर प्रक्रिया आज पूर्ण झाली. यानंतर वाझेने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
विशेष सीबीआय न्यायालयात वाझेला आज माफीचा साक्षीदार बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदोपत्री कार्यवाहीची पूर्तता करण्यात आली. यामुळे आता वाझे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील खटल्यात अधिकृतपणे माफीचा साक्षीदार झाला आहे. विशेष न्या. डी. पी शिंगाडे यांनी त्याला माफीचा साक्षीदार होण्यासाठी अटींची माहिती दिली. यावर वाझेने सहमती दिली आहे.
तसेच आज न्यायालयात त्याने नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. यावर सीबीआयला भूमिका मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यातील आणखी एक आरोपी संजीव पलांडे यांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे. या दोन्ही अर्जावर २० जून रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला, असा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे. या आरोपाचे खंडन देशमुख यांनी केले आहे.
----------------------
पुढील आठवड्यात सुनावणी
देशमुख यांच्यासह सर्व आरोपींना आज न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात आले होते. त्यावेळी वाझेने जामीन अर्ज आणि खटल्यातील त्याची भूमिका याबाबत प्रश्न केला; मात्र माफीचा साक्षीदार झाला, तरी जामीन मंजूर होईल असे नाही. कारण सीबीआयला या खटल्यात सहकार्य करत नाही, तोपर्यंत त्यांना प्रथमदर्शनी जामीन मिळू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावर आता सीबीआय पुढील सुनावणीमध्ये भूमिका मांडणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06726 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top