बारावीचा आज निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावीचा आज निकाल
बारावीचा आज निकाल

बारावीचा आज निकाल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल या महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या बुधवार, ८ जून रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातून या वेळी १४ लाख ८५ हजार २९१ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यांना मंडळाच्या www.mahresult.nic.in तसेच www.hscresult.mkcl.org आणि https://hsc.mahresults.org.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. मागील वर्षी निकाल जाहीर होताच संकेतस्थळ चालत नव्हते, त्यामुळे मंडळाकडून या वेळी योग्य खबरदारी घेण्यात आली असून काही खासगी संस्थांनाही निकाल जाहीर करण्यासाठी ॲक्सेस देण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही बारावीच्या लेखी परीक्षेचे आयोजन केले होते. त्यानंतर या परीक्षेचे पेपर तपासणीवर विविध संघटनांनी बहिष्कार टाकून त्यासाठी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही मंडळाकडून योग्य नियोजन करत हा निकाल केवळ ६० दिवसांच्या आत जाहीर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल; तर www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल; तर विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात १७ जून रोजी मूळ गुणपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गुणपडताळणीसाठी १० ते २० जूनचा कालावधी
गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी १० ते २० जूनपर्यंत आणि छायाप्रतीसाठी १० ते २९ जूनपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये
मंडळाकडून जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. यात पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी १० जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06728 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top