वैद्यकीय महाविद्यालये संलग्नित रुग्णालयांमध्ये पदभरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय महाविद्यालये संलग्नित रुग्णालयांमध्ये पदभरती
वैद्यकीय महाविद्यालये संलग्नित रुग्णालयांमध्ये पदभरती

वैद्यकीय महाविद्यालये संलग्नित रुग्णालयांमध्ये पदभरती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : सध्या राज्यात कोविड रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून बाह्यस्रोताद्वारे पदभरतीची सूचना सोमवारी जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या तसेच नव्याने सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित असलेल्या रुग्णालयांसाठी वर्ग ३ तसेच वर्ग ४ कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याचे सांगण्यात आले आहे. ही भरती बाह्यस्रोताने उपलब्ध करून देण्यासाठी संचालनालयाच्या फेब्रुवारीमधील पत्रातून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच एप्रिल महिन्यात संबंधित विभागांना कळवून शासन निर्णयानुसार पदे बाह्यस्रोताने भरण्यास मान्यता देण्यात आली. पदभरतीची कार्यवाही सूचना संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
सद्यस्थितीत कोरोना संसर्गाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन रुग्णसेवेच्या दृष्टीने पदांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. यासाठी वर्ग ४ रिक्त पदे नियमितपणे भरली जाईपर्यंत ५० टक्के पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तशी सूचना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून जारी करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06731 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top