
मुंबईत रुग्ण संख्येत दुपटीने वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाला असून रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल १,७६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत असून मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर पाहावयास मिळत आहे. दरम्यान, कोरोनाची चौथी लाट रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.
मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा विस्फोट झाला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी १,२४२ रुग्णांची नोंद झाली होती; तर दुसऱ्या दिवशी बुधवारी रुग्णसंख्येत ५०० ने वाढ होत तब्बल १,७६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ७३ हजार ५४१ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात ७३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ४६ हजार ९७२ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सात हजार सक्रिय रुग्ण आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06766 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..