फिर्याद दाखल करण्यास परमबीर यांच्याकडून दुर्लक्ष! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिर्याद दाखल करण्यास
परमबीर यांच्याकडून दुर्लक्ष!
फिर्याद दाखल करण्यास परमबीर यांच्याकडून दुर्लक्ष!

फिर्याद दाखल करण्यास परमबीर यांच्याकडून दुर्लक्ष!

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : शीना बोरा बेपत्ता झाल्याची माहिती मी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना दिली होती; पण त्यांनी फिर्याद दाखल करण्यासाठी कोणतीही विशेष मदत केली नाही, अशी साक्ष आज शीनाचा मित्र आणि आरोपी पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल याने विशेष न्यायालयात दिली.
‘परमबीर सिंग हे माझ्या आईच्या परिचयाचे होते. शीना बेपत्ता झाली तेव्हा ते कोकण विभागाचे पोलिस महासंचालक होते. शीना हरवली तेव्हा सर्वप्रथम ही माहिती मी २०१२ मध्ये त्यांना दिली होती. त्यांनी मला ती बेपत्ता झाल्याबाबत पोलिस तक्रार करण्यास सांगितले; पण पोलिसांनी माझी तक्रार लिहून घेतली नाही. तसेच सिंग यांनीही तक्रार दाखल करण्यासाठी विशेष मदतही केली नाही, असा जबाब राहुलने आज न्यायालयात दिला. शीना बोरा प्रकरणात इंद्राणी मुखर्जीसह पीटर मुखर्जी हादेखील आरोपी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06806 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top