म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज सुरू
म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज सुरू

म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज सुरू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील विविध गृहनिर्माण योजनांतील पाच हजार ६९ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा प्रारंभ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते गुरुवारी गो-लाईव्ह कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन येथील कार्यालयात काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने आदी उपस्थित होते. या वेळी आव्हाड यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.

असे आहे वेळापत्रक
९ जून रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ऑनलार्इन अर्जनोंदणीला सुरुवात झाली असून ९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार १० जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज करू शकतील. १० जुलै रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. ११ जुलै रात्री ११.५९ पर्यंत ऑनलार्इन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. १२ जुलै रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर केली जाणार आहे.

किती व कोठे आहेत सदनिका
सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत एकूण १९४५ सदनिकांचा सोडतीत समावेश असून पुणे महापालिकेच्या हद्दीत ५७५ सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत १३७० सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत २७९ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील १७० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील दोन हजार ६७५ सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06810 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top