उकेंविरोधात ईडीचे न्यायालयात आरोपपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उकेंविरोधात ईडीचे न्यायालयात आरोपपत्र
उकेंविरोधात ईडीचे न्यायालयात आरोपपत्र

उकेंविरोधात ईडीचे न्यायालयात आरोपपत्र

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला दाखल करणारे नागपूरमधील वकील सतीश उके यांच्यासह दोघांविरोधात शनिवारी जमीन खरेदी प्रकरणात ईडीने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यावरील खटल्याची कारवाई न्यायालयाने सुरू केली आहे.

मनी लॉण्डरिंगच्या आरोपात उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप यांना ईडीने मार्चमध्ये अटक केली आहे. यामध्ये ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल गुरुवारी न्यायालयाने घेतली आणि खटल्याची कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले. बोखिरा येथे सुमारे साडेपाच एकर जमीन खरेदी करताना बोगस कागदपत्रे दाखल केली, शस्त्रांचा धाक दाखवला, असा आरोप करून मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने उके आणि त्यांचे बंधू प्रदीप यांना तडकाफडकी अटक केली होती. फडणवीस यांच्याविरोधात खटले दाखल केल्यामुळे उके यांचे नाव चर्चेत आले होते. नागपुरात त्यांना अटक करून मुंबईमध्ये आणण्यात आले होते. तेव्हापासून ते अटकेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06848 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top