
रेल्वे परीक्षेसाठी म्हाडाचा यशस्वी उमेदवारांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : म्हाडा भरती परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक म्हाडाने जाहीर केले आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक व सहायक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांना रेल्वे भरती परीक्षेमुळे म्हाडाच्या कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे कठीण होणार आहे. अशा उमेदवारांना म्हाडाने सवलत दिली असून उमेदवारांना १६ व १७ जून रोजी म्हाडात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
म्हाडा भरती परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. या परीक्षेतील कागदपत्र पडताळणीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक व सहायक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी १४ ते १६ जून या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात होणार आहे. मात्र रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या १४ जून रोजीच्या परीक्षेमुळे म्हाडा भरती परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी १४ व १५ जून रोजी उपस्थित राहता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाने संबंधित उमेदवारांना १६ व १७ जून रोजी कागदपत्र पडताळणीसाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या परीक्षेच्या प्रवेश पत्रासह म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन म्हाडा प्रशासनाने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06856 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..