स्कूल बसने प्रवास महागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्कूल बसने प्रवास महागला
स्कूल बसने प्रवास महागला

स्कूल बसने प्रवास महागला

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : मुंबईसह राज्यभरात सोमवारपासून शाळांना सुरुवात होत आहे. त्यात महागाईमुळे वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत. हे कमी की काय म्हणून आता पालकांना स्कूल बससाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण स्कूल बसेसने शाळेच्या पहिल्या दिवसापासून २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी याबाबत माहिती दिली.

देशात इंधनांच्या दरांमुळे महागाई गगनाला भिडली आहे. याचा फटका स्कूल बस चालक-मालक यांनाही बसला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता शाळेच्या पहिल्या दिवसापासून स्कूल बसच्या दरात २० टक्के वाढ करण्यात आलेली आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग याबद्दल म्हणाले, की मागील दोन वर्षांपासून आम्ही आर्थिक संकटात आहोत; मात्र आमची बाजू कोणीही ऐकून घेतली नाही. एप्रिलमध्ये आम्ही स्कूल बसच्या भाड्यात ३० टक्के वाढ करण्याचा विचार करत होतो, परंतु पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही ही दरवाढ २० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा विचार केला आहे.

स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून एका विद्यार्थ्याला वर्षाकाठी एक हजार ८०० रुपयेप्रमाणे वाहतूक शुल्क घेतले जात आहे. आमच्या मोठ्या बसमध्ये ४० विद्यार्थ्यांची आसनक्षमता आणि त्यासाठीची परवानगी असते; मात्र बेकायदा सुरू असलेल्या स्कूल वाहन, बस, रिक्षा यांच्याकडे हे काहीच नसताना त्यांनी आपले दर प्रतिविद्यार्थी एक हजार ६०० ते दोन हजारांपर्यंत ठेवले असून त्यामुळे त्यांनी ३० टक्क्यांपर्यंत हे दर वाढवलेले आहेत. यामुळे शहरी भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला‍ असल्याचेही गर्ग म्हणाले.

पूर्वप्राथमिकची मागणी घटली
पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सोडण्यासाठी बहुतेक ठिकाणी पालकांनीच पर्याय शोधले असल्याने त्यासाठीची मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडे घटली आहे. त्यामुळे अधिक प्रतिसाद मिळेल अशाच मार्गावर बस चालवल्या जाणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06870 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top