कांजूरमार्गमधील जमीन खासगी कंपनीस देण्याचा निर्णय रद्दबातल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांजूरमार्गमधील जमीन खासगी कंपनीस देण्याचा निर्णय रद्दबातल
कांजूरमार्गमधील जमीन खासगी कंपनीस देण्याचा निर्णय रद्दबातल

कांजूरमार्गमधील जमीन खासगी कंपनीस देण्याचा निर्णय रद्दबातल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : कांजूरमार्गमधील तब्बल ६ हजार हेक्टर जमिनीचा विकास करण्याचा अधिकार सहमतीने खासगी कंपनीला देण्याचा उच्च न्यायालयाचा यापूर्वीचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केला. मेट्रो कारशेडच्या सुमारे १०२ एकरच्या जागेचा यामध्ये सहभाग आहे. यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये न्यायालयात दिशाभूल करणारी माहिती दाखल करून जमीन विकसित करण्याचे अधिकार गैरपद्धतीने कंपनीने मिळविले, असे दिसून येत आहे. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात आले नाही. त्यामुळे सरकार आणि अन्य पक्षकारांना अनभिज्ञ ठेवून संबंधित आदेश गैरप्रकारे मिळवण्यात आला आहे, असे निरीक्षण न्या. ए. के. मेनन यांनी नोंदवले आहे. तसेच आदर्श वॉटर पार्क ॲण्ड रिसॉर्टचा मालकी हक्क नामंजूर केला. सरकार आणि अन्य मालकी हक्कांवर वाद प्रलंबित आहे. या सुमारे सहा हजार हेक्टरच्या जमिनीमध्ये मेट्रो कारशेडच्या सुमारे १०२ एकरच्या जमिनीचा समावेश आहे. या जमिनीच्या मालकी हक्काबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये न्यायालयीन लढा सुरू आहे. यावर अद्याप न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. मात्र संबंधित जमिनीवरील खासगी कंपनीचा हक्क न्यायालयाने अमान्य केला आहे. केंद्र सरकारच्या मीठ विभागाने या जमिनीवर हक्क सांगितला आहे; तर मेट्रो कारशेडचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयात याचिका केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06929 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top