राणा दाम्पत्याची न्यायालयात हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणा दाम्पत्याची न्यायालयात हजेरी
राणा दाम्पत्याची न्यायालयात हजेरी

राणा दाम्पत्याची न्यायालयात हजेरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या प्रकरणात आज आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी विशेष न्यायालयात हजेरी लावली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणातील एका फौजदारी फिर्यादीमध्ये नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. त्या वेळी राणा पती-पत्नी गैरहजर होते. आज त्यांनी हजेरी लावून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता खटल्याच्या कारवाईला लवकरच प्रारंभ होण्याची शक्यता आहे. यावर पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान राणा पती-पत्नीने ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला दिले होते; मात्र ऐनवेळी त्यांनी हे आंदोलन मागे घेतले, परंतु यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे सामाजिक शांतता भंग झाली आणि पोलिसांना कर्तव्य बजावण्यात आडकाठी करण्यात आली, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06931 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top