एसआरएने विकसकाचे एक कोटी केले जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआरएने विकसकाचे एक कोटी केले जप्त
एसआरएने विकसकाचे एक कोटी केले जप्त

एसआरएने विकसकाचे एक कोटी केले जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : सांताक्रूझ येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा भरलेल्या विकसकाने प्रकल्प राबवण्यास नकार दिल्याने अखेर एसआरएने या विकसकाची एक कोटी रुपयांची अनामत रक्कम जप्त केली आहे. रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसआरएने विकसकाची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या निविदा प्रक्रियेला विकसकांनी प्रतिसाद दिल्यास एसआरएचा विकसक नियुक्तीचा पहिला प्रकल्प मार्गी लागणार आहे.

सांताक्रूझ पूर्वेकडील कोळे कल्याण येथील ओम नमो सुजलाम सुफलाम को-ऑप. हौ. सोसायटीचा रहिवाशी आणि विकसक यांच्यामधील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. यावर न्यायालयाने येथील झोपड्यांचा पुनर्विकास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबवून रहिवाशांना घरे देण्याचे निर्देश २०१८ मध्ये दिले होते. यानंतर ही योजना राबवण्यासाठी एसआरएने निविदा प्रक्रिया राबवली. या वेळी हा प्रकल्प राबवण्यास तीन विकसक पुढे आले. यामधून एका विकसकाची निवड झाली. या विकसकाने प्रकल्प सुरू करण्यासाठी प्राधिकरणाकडे एक कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा केली होती; मात्र हा प्रकल्पात राबवण्यात स्वारस्य नसल्याचे पत्र विकसकाने दिल्याने एसआरएने या विकसकाची अनामत रक्कम जप्त केली आहे.

१३ जुलैपर्यंत निविदा भरण्यास मुदत
आता या प्रकल्पासाठी विकसकाची नेमणूक करण्यासाठी एसआरएने नव्याने निविदा मागवल्या आहेत. त्यानुसार विकसकांना १३ जुलैपर्यंत निविदा भरता येणार आहेत.
ओम नमो सुजलाम सुफलाम को-ऑप. हौ. सोसायटीने सांताक्रूझ येथील सुमारे पाच एकर भूखंड खासगी मालकांकडून खरेदी केला आहे. त्यामुळे रहिवाशांना अधिकाधिक कॉर्पस फंड देणाऱ्या विकसकाला या प्रकल्पाचे काम देण्यात येणार आहे. तसेच नियुक्त होणाऱ्या विकसकाला रहिवाशांना ३०० चौरस फुटाचे घर द्यावे लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06935 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top