सौर आणि पवनऊर्जेतून मुंबई विमानतळावर वीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौर आणि पवनऊर्जेतून मुंबई विमानतळावर वीज
सौर आणि पवनऊर्जेतून मुंबई विमानतळावर वीज

सौर आणि पवनऊर्जेतून मुंबई विमानतळावर वीज

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) सौर आणि पवनऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा प्रयोग करण्यात येणार आहे. विंडस्ट्रीम एनर्जी टेक्नॉलॉजिस कंपनीच्या माध्यमातून पारंपरिक विजेवर अवलंबून न राहता अशा प्रकारची हायब्रिड वीजनिर्मिती करणारे मुंबई विमानतळ देशातील पहिले ठरले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

‘सीएसएमआयए’ने नव्या प्रकल्पासाठी १० केडब्‍ल्‍यूपी हायब्रिड सोलर प्लेट्स लावल्या आहे. त्यातून प्रतिदिन कमीत कमी ३६ केडब्ल्‍यूएच ऊर्जानिर्मिती होईल असा अंदाज आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेली ऊर्जा विशिष्ट गरजांनुसार वापरली जाणार आहे.
इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी एजन्सी (आयआरईएनए)च्या माहितीनुसार ११ एप्रिल २०२२ पर्यंत जगातील पुनर्नवीकरणीय ऊर्जानिर्मिती क्षमतेमधील पवनऊर्जेचे योगदान २७ टक्‍के इतके आहे. व्‍हीएडब्‍ल्‍यूटी तंत्रज्ञानामुळे २५ वर्षांसाठी प्रतिवर्षी १३१४० केडब्‍ल्‍यूएच इतकी ऊर्जानिर्मिती होईल आणि सध्या वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या मिश्र ऊर्जांमधील पुनर्नवीकरणीय ऊर्जेच्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज विमानतळ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06938 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top