कंबोज यांना पालिकेच्या कारवाईपासून दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंबोज यांना पालिकेच्या कारवाईपासून दिलासा
कंबोज यांना पालिकेच्या कारवाईपासून दिलासा

कंबोज यांना पालिकेच्या कारवाईपासून दिलासा

sakal_logo
By

मुंबई, ता १५ : भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या निवासस्थानासंबंधित मुंबई पालिकेने बजावलेल्या नोटिशीला आज मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तसेच बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याचे निर्देश कंबोज यांना देण्यात आले आहे. यामुळे मोहित कंबोज यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कंबोज यांच्या खार येथील निवासस्थानी अवैध बांधकाम केल्याचा दावा पालिकेने केला आहे. यावर पालिकेने नोटीस बजावली असून खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात त्यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने नोटिशीला अंतरिम स्थगिती दिली आहे. तसेच याबाबत तीन आठवड्यांत पालिकेला बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले. या अर्जावर निर्णय घ्यावा आणि जर कंबोज यांच्याविरोधात निर्णय असेल तर त्यावर महापालिकेने दोन आठवडे कारवाई करू नये, असे न्यायालयाने निर्देश दिले. यावर पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. खार येथील कथित अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्याची तयारी पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली होती; मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आता कोणतीही कारवाई करण्यास मनाई करण्यात आली आहे. राजकीय हेतूने पालिकेने कारवाई केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06944 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top