
अनधिकृत फलकबाजीवर कारवाई का नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : अनधिकृत फलकबाजीवर तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई का होत नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केला. तसेच फलकबाजीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
राज्यात ३८३ नगर पालिका, २६ महापालिका आहेत. यापैकी ३८१ नगरपालिका आणि २३ महपालिकांनी आपला तपशील न्यायालयात दाखल केला आहे; मात्र यामध्ये केवळ केवळ ११ नगर पालिका आणि फक्त दोनच महापालिकांची उत्तरे प्रतिज्ञापत्रावर मिळाल्याची माहिती याचिकादारांनी दिली. सुस्वराज्य फाऊंडेशन यांनी केलेल्या मूळ जनहित याचिकेत बेकायदा बॅनरबाजीविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत. राजकीय दबावामुळे पोलिस कारवाई करत नाहीत, असे या वेळी सांगण्यात आले. राज्य सरकार बेकायदा बॅनरवर धोरण तयार करत आहे, अशी माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली; तर मुंबई पालिकेकडून होर्डिंगच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर तसेच ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच या कारवाईसाठी २६ वाहने कर्मचाऱ्यांसह तैनात केल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06969 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..