राज्यात बीए. ५ चे आणखी दोन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात बीए. ५ चे आणखी दोन रुग्ण
राज्यात बीए. ५ चे आणखी दोन रुग्ण

राज्यात बीए. ५ चे आणखी दोन रुग्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए. ५ व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए. ४ आणि बीए. ५ रुग्णांची संख्या १९ झाली आहे. नागपूरमध्ये आढळलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण २९ वर्षीय पुरुष असून दुसरा रुग्ण ५४ वर्षांची महिला आहे. त्यांनी मागील आठवड्यात अनुक्रमे केरळ आणि मुंबई येथे प्रवास केला आहे. ६ जून आणि ९ जून रोजी ते कोविड बाधित आढळले होते. या दोघांचेही लसीकरण झालेले असून हे दोन्ही रुग्ण घरी विलगीकरणात बरे झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06972 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top