अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राकडे नवीन गुंतवणूकदारांचा ओघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राकडे नवीन गुंतवणूकदारांचा ओघ
अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राकडे नवीन गुंतवणूकदारांचा ओघ

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राकडे नवीन गुंतवणूकदारांचा ओघ

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : नवीन अपांरपरिक ऊर्जानिर्मिती धोरणामुळे विकासाचे वारे वाहू लागले आहेत. राज्याच्या ऊर्जानिर्मिती क्षेत्राला नवीन चालना मिळाली आहे. नुकत्याच स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्यातील अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आणि विकसक आता या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. लवकरच नव्याने ४० हजार कोटींची गुंतवणूक त्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सादर केलेल्या अपारंपरिक ऊर्जानिर्मिती धोरणामुळे विजेच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्णत्वाकडे मार्गक्रमण करीत आहे. या धोरणाअंतर्गत राज्यातील तब्बल १३६ ठिकाणी १ हजार २४७ मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शिवाय सहा ठिकाणी १३६ मेगावॉट क्षमतेच्या सहनिर्मिती प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांसाठीची मंजुरी देण्यात आली आहे. तीन ठिकाणी १२.५ मेगावॉटचे पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या धोरणाअंतर्गत ‘महानिर्मिती’मार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील इरई धरणावर १०५ मेगावॉटचा तरंगता सौर प्रकल्प होत आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ५८८ मेगावॉट, ईपीसी मोडअंतर्गत ६०२ मेगावॉट, दोंडाईचा (धुळे) येथे २५० मेगावॉट आणि एनटीपीसीच्या सहकार्याने २ हजार ५०० मेगावॉटच्या अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. शिवाय ईईएसएलच्या सहकार्याने महावितरण आपल्या उपकेंद्रावर २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प विकसित करत आहे. ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा अशक्य असलेल्या अत्यंत दुर्गम ठिकाणी महाऊर्जाने ६०६९ सौर दिवे वितरित केले आहेत. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प विकसक आणि गुंतवणूकदार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन म्हणून स्वत: किंवा कॅप्टिव्ह वापरासाठी स्थापित केलेल्या सर्व अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी पहिल्या दहा वर्षांसाठी वीजशुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

सौर आणि पवन प्रकल्पांसाठी अकृषक करात सवलत
कोरोनामुळे रखडलेला ४१८ मेगावॉटचा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. कोणत्याही बंधनकारक घटकाच्या करार पूर्ततेसाठी राज्य आधारित अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांमधून किमान ५० टक्के अक्षय ऊर्जा मिळवण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे याचिका करण्यास मान्यता देण्यात आली असून राज्य महामंडळ आणि कृषी विद्यापीठांच्या वापरात नसलेल्या जमिनींना सौर प्रकल्पांच्या विकासासाठी वीज विकण्याकरिता किंवा तृतीय पक्षाच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06995 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top