बारा वर्षानंतर तिने दहावीत उत्तीर्ण होण्याची जिद्द केली पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारा वर्षानंतर तिने दहावीत उत्तीर्ण होण्याची जिद्द केली पूर्ण
बारा वर्षानंतर तिने दहावीत उत्तीर्ण होण्याची जिद्द केली पूर्ण

बारा वर्षानंतर तिने दहावीत उत्तीर्ण होण्याची जिद्द केली पूर्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : ‍घरची परिस्थिती बेताची असल्याने बारा वर्षांपूर्वी घरच्यांनी लग्न लावून दिले. त्यामुळे शिक्षण सुटले होते. त्यानंतर रोज घरचे काम आणि एका कंपनीत नोकरी करत मनीषा सुरवसे हिने रात्रशाळेतून शिक्षण‍ घेऊन ८१.४० टक्के गुण मिळवत मोठे यश संपादन केले आहे. मनीषा सुरवसे ही परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथील मूळची रहिवाशी. आठवीत असताच तिचे शिक्षण सुटले होते. मात्र शिक्षण घेण्याची तिची जिद्द कायम असल्याने तिने बारा वर्षांनंतर मानखुर्द येथे असलेल्या सदगुरू नाईट स्कूल, ज्युनियर कॉलेजमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याची जिद्द पूर्ण केली आहे. आता ती मानखुर्द येथील साठे नगरात आपल्या पतीसोबत राहते. तिला एक मूल असून दहावीनंतर तिला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. दुसरीकडे याच रात्रशाळेतून कोमल गायकवाड हिने रोज एका खाजगी कंपनीत नोकरी करून ८३ टक्के गुण मिळवले आहेत. मागील वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर घराचा सर्व भार आपल्या खांद्यावर घेऊन नोकरी करत साक्षी आवळेंनीही ७८.६० टक्के गुण मिळवले आहेत. ती शिवाजीनगर येथे राहते. या रात्रशाळेत दहावीच्या परीक्षेला बसलेल्या २५ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्याचा मार्ग मिळवला असल्याने त्यांचे संस्थेचे प्रमुख राजाराम काळे यांनी अभिनंदन केले आहे.

मुंबईसह राज्यात असलेल्या १३० रात्रशाळांपैकी ४९ हून अधिक रात्रशाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे; तर ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्याही यावेळी वाढली असल्याने सर्वच शाळांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06999 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top