अकरावीच्या दुसऱ्या टप्प्यांची सुरुवात २२ जूनला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीच्या दुसऱ्या टप्प्यांची सुरुवात २२ जूनला
अकरावीच्या दुसऱ्या टप्प्यांची सुरुवात २२ जूनला

अकरावीच्या दुसऱ्या टप्प्यांची सुरुवात २२ जूनला

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होते. मात्र, या वेळी केंद्रीय मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर होऊ शकले नसल्याने प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया ही २२ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालय आणि शाखेची निवड करण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबईसह राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी आत्तापर्यंत पहिल्या टप्प्यातील नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडीपासून इतर माहिती भरण्यासाठी २२ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे; तर या वेळी दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी केंद्रीय मंडळाच्या परीक्षेच्या निकालानंतरच मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीची स्पर्धा आणि त्यासाठीचे चित्र लक्षात येणार आहे.

दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून ३ लाख ४१ हजार ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई महानगरक्षेत्रात अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी ८३८ कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात ३ लाख २१ हजार ७९० प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. यातच अल्पसंख्याक महाविद्यालये ३९८ असून त्यांच्याकडे एकूण १ लाख ७६ हजार ३७० जागा आहेत. त्यात केवळ ३५ टक्केच जागा ऑनलाईन प्रवेशासाठी मिळणार आहेत. दरम्यान, केंद्रीय मंडळांचा दहावीचा निकाल लागणे बाकी असल्याने मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालये मिळवणे अवघड होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07013 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top