बेड ॲण्ड ब्रेकफास्ट गेस्ट हाऊसला पालिकेचा परवाना आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेड ॲण्ड ब्रेकफास्ट गेस्ट हाऊसला पालिकेचा परवाना आवश्‍यक
बेड ॲण्ड ब्रेकफास्ट गेस्ट हाऊसला पालिकेचा परवाना आवश्‍यक

बेड ॲण्ड ब्रेकफास्ट गेस्ट हाऊसला पालिकेचा परवाना आवश्‍यक

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : बेड ॲण्ड ब्रेकफास्ट या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या रेस्टॉरंट आणि गेस्ट हाऊसना मुंबई महापालिकेचा परवाना आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यासंबंधित एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

जुहू येथील एका घरामध्ये चालवण्यात येणाऱ्या गेस्टहाऊसवर पालिकेने कारवाई केली आहे. या गेस्ट हाऊसमधील सामान जप्त करण्यासंबंधी नोटीस महापालिकेने बजावली आहे. या नोटिशीविरोधात गेस्टहाऊस मालक हरमेश सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. एमटीडीसीचे अधिकृत गेस्ट हाऊस असल्यामुळे मुंबई पालिकेच्या स्वतंत्र परवान्याची आवश्यकता नाही. तसेच हा उपक्रम घरगुती पद्धतीने सुरू आहे, यामध्ये एमटीडीसीकडून परवानगी आवश्यक आहे, असा युक्तिवाद गेस्ट हाऊस मालकाकडून करण्यात आला होता. मात्र मुंबई पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या व्यवसायासाठी पालिकेचा परवाना आवश्यक आहे, असा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला. न्या. भारती डांग्रे यांच्यापुढे यावर सुनावणी झाली. संबंधित उपक्रम एमटीडीसी अंतर्गत असला आणि घरामध्येच व्यावसायिक काम सुरू केले असले तरी मुंबई पालिकेचा अधिकृत परवाना मिळणे अत्यावश्यक आहे आणि पालिका अशी नोटीस बजावू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. जुहूमधील निवासी बंगल्यात संबंधित रेस्टॉरंट सुरू आहे. मात्र यासाठी आवश्यक पालिकेचा परवाना न घेतल्यामुळे पालिकेने सामान जप्तीची नोटीस बजावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07018 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top