झोपड्यांचे डिजिटल सर्वेक्षण सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपड्यांचे डिजिटल सर्वेक्षण सुरू होणार
झोपड्यांचे डिजिटल सर्वेक्षण सुरू होणार

झोपड्यांचे डिजिटल सर्वेक्षण सुरू होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईतील झोपड्यांच्या डिजिटल सर्वेक्षणाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. राज्य सरकारच्या एसआरए झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोविड काळात थंडावलेले सर्वेक्षणाचे काम पुन्हा एकदा हाती घेण्यात आले आहे. शिवडी येथील आझाद नगर झोपडपट्टीच्या सर्वेक्षणापासून याची सुरुवात होणार असून १५ जुलैपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शिवडीतील जकेरीया बंदर रोडवरील आझाद नगर वसाहत आणि एम. जेठा चाळ येथील ४०० झोपड्यांचे डिजिटल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १५ दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एसआरएच्या वतीने करण्यात येणाऱ्या झोपड्यांच्या डिजिटल सर्वेक्षणाबाबत राहिवाशांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवडी पूर्वमधील जकेरीया बंदर रोडवरील आझाद नगर वसाहत आणि एम.जेठा चाळ येथील किमान ४०० झोपड्यांचे सर्वेक्षण होणार असल्याने गैरसमजुतीमधून राहिवाशांकडून अधिकाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वेक्षणाबाबत रहिवाशांमध्ये जागृती करण्याचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात झोपडपट्टीधारकाची संपूर्ण माहिती, झोपडीचे जीआयएस मॅपिंग, तसेच घरमालकाचा बायोमेट्रिक ऑनलाईन सर्व्हे करून त्याचा डेटा तयार करण्यात येईल. झोपडपट्टीधारकाची पात्रता सिद्ध करून पात्र झोपडीधारकाला एसआरएच्या वतीने डिजिटल स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.
.....
येत्या १५ जुलैपासून डिजिटल सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होईल. पुढील १५ दिवसांत काम पूर्ण केले जाईल. यामुळे एका क्लिकवर त्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. झोपडपट्टीधारकांच्या हिताचा हा सर्व्हे असून त्यांनी सहकार्य करावे.
- मयूर कांबळे, प्रकल्प व्यवस्थापक, बायोमेट्रिक सर्वेक्षण कक्ष
.....
डिजिटल सर्वेक्षणाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी लोकांमध्ये डिजिटल सर्वेक्षणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांचा विरोध मावळेल.
- सचिन पडवळ, स्थानिक माजी नगरसेवक

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07037 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top