मुसळधारेच्या इशाऱ्यानंतरही मुंबईत जेमतेम पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुसळधारेच्या इशाऱ्यानंतरही मुंबईत जेमतेम पाऊस
मुसळधारेच्या इशाऱ्यानंतरही मुंबईत जेमतेम पाऊस

मुसळधारेच्या इशाऱ्यानंतरही मुंबईत जेमतेम पाऊस

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय होणार असून रविवारपासून मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. त्याप्रमाणे शनिवारी रात्रीपासून मुंबईतील विविध भागांत पावसाने हजेरी लावली; परंतु जोर काही धरला नाही. दिवसभरात मुंबईत जेमतेम १२ मि.मी. पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ११ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर अधूनमधून सरी बरसल्या; परंतु पावसाचा जोर काही जाणवला नाही. हवामान विभागाने रविवारी मान्सून मुंबईत सक्रिय होणार असल्याचा अंदाज शुक्रवारी व्यक्त करत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता; मात्र दिवसभरात मुसळधार दिसली नाही. शिवाय ऊन-पावसाचा लपंडावही सुरू राहिल्याने हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा फोल ठरला.
राविवारी मुंबईत एकूण १२.०७ मि.मी. पाऊस झाला. भायखळा (१८ मि.मी.), सीएसएमटी (११) आणि विद्याविहारमध्ये (८) पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. जुहू, सांताक्रूझ, चेंबूर, माटुंगा आणि सायनमध्ये हलक्या सरी कोसळल्या.

रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सोमवार ते बुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस तरी पाऊस बरसणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
......
रविवारचा पाऊस
मुंबई शहर ः २२.६४ मि.मी.
पश्चिम उपनगर ः ८.०१ मि.मी.
पूर्व उपनगर ः ५.५८ मि.मी.
एकूण ः १२.०७ मि.मी.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07044 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top