पदोन्नतीसाठी आवश्यक डीएसएम परीक्षा पुढे ढकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदोन्नतीसाठी आवश्यक डीएसएम परीक्षा पुढे ढकली
पदोन्नतीसाठी आवश्यक डीएसएम परीक्षा पुढे ढकली

पदोन्नतीसाठी आवश्यक डीएसएम परीक्षा पुढे ढकली

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये नियमित असलेल्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली शाळा व्यवस्थापन पदविका (डीएसएम) परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात ही परीक्षा २४ ते ३० जून या कालावधीत होणार होती; मात्र शाळा सुरू असल्याच्या कालावधीत ती होत असल्याने शिक्षक संघटनांनी त्याला विरोध केला हेाता. त्यामुळे या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

२४ ते ३० जूनदरम्यान डीएसएम परीक्षा राज्यभरात होणार होती. शाळा सुरू होत असतानाच परीक्षा होत असल्याने शिक्षकांनी त्यासाठी विशेष रजा सवलत देण्याची मागणी करत ती सुट्टीच्या दिवशी घेतली जावी, असा आग्रह महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने विद्यापीठाकडे धरला होता. त्यामुळे मुक्त विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे.

राज्यात प्रत्येक वर्षी डीएसएम पदविका परीक्षा उन्हाळ्याच्या सुट्टीत होते; मात्र यंदा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून ती जूनमध्ये शाळा सुरू असल्याच्या दिवशी घेण्यात येणार होती. त्यावर शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला होता. शिवाय, त्या दिवशी शिक्षकांना आपल्या शाळांमध्ये हजर राहता येणार नाही. त्यामुळे शाळांमध्ये गैरहजर म्हणून नोंद होणार असल्याने शालेय‍ शिक्षण विभागाने परीक्षेच्या दिवशी विशेष रजा मंजूर करावी, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांच्याकडे होती. डीएसएम परीक्षेला नियमित सेवेत असलेले शिक्षक बसतात. या परीक्षेमुळे शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घेता येतो. त्यासाठी शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही परीक्षा खूप महत्त्वाची असल्याने असंख्य शिक्षक त्याची तयारी करत असतात. त्यामुळे ही परीक्षा सुट्टीच्या दिवशी घ्यावी, अशी मागणी घागस यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07074 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top