‘उत्पादन शुल्क’च्या महसुलात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उत्पादन शुल्क’च्या महसुलात वाढ
‘उत्पादन शुल्क’च्या महसुलात वाढ

‘उत्पादन शुल्क’च्या महसुलात वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात यंदा मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तब्बल १०१.३५ टक्क्यांनी महसूल वाढला आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते मे महिन्यात एक हजार ७२५.५६ कोटींचा महसूल मिळाला होता; मात्र या वर्षी दोन महिन्यांत तिप्पट कमाई करत तब्बल तीन हजार ४७४.३६ कोटींची कमाई झाली आहे.
कोरोना काळात मद्यउत्पादन आणि विक्रीत घट झाली होती; मात्र आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर राज्यभरात तळीरामांकडून मोठ्या प्रमाणात मद्याची खरेदी झाली. परिणामी उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात मोठी वाढ झाली. राज्यातील उत्पादन शुल्कच्या एकूण महसुलापैकी ठाणे विभागात ११५.११ टक्के, नाशिक- ९३.१० टक्के, पुणे ६३.७६ टक्के, कोल्हापूर १२५.६१ टक्के, औरंगाबाद १२७.२१ टक्के, नागपूर १६९.५२ टक्के वाढ झाली.
---
विभाग- १ एप्रिल ते १४ जून २०२१ - १ एप्रिल ते १४ जून २०२२
ठाणे- २४८.९० कोटी - ५३५.४१ कोटी
नाशिक- ४१६.४५ कोटी - ८०४.१४ कोटी
पुणे- ४६९.९५ कोटी - ७६९.६० कोटी
कोल्हापूर- ७२.५ कोटी - १६२.५६ कोटी
औरंगाबाद- ४५८.५९ कोटी - १०४१.९७ कोटी
नागपूर- ५९.६१ कोटी - १६०.६७ कोटी
एकूण- १७२५.५६ - ३४७४.३६ कोटी

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07082 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top