राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू
राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू
राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू

राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : पर्यावरणपूरक आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत आहे. साहजिकच इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज्यात १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. ठाणे ५, नवी मुंबई २, पुणे ५ आणि नागपूरमध्ये १ स्टेशन सुरू झाले आहे. राज्यातील विविध ठिकाणी २ हजार ३७५ स्टेशन प्रस्तावित आहेत.

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टीम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉलजवळ कुणीही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतो. त्याशिवाय आता महामार्गाच्या बाजूला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येत आहेत. राज्य शासनाने चार्जिंग पायाभूत सुविधा पुरवण्याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. खासगी व्यक्तींना चार्जिंग स्टेशन उभारायचे असल्यास त्यांना महावितरणतर्फे प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या निर्णयात चार्जिंग स्टेशनसाठी वित्तीय प्रोत्साहन जाहीर करण्यात आले आहे. निम-सार्वजनिक चार्जिंग स्टेशनसाठी मंदगतीचे १५ हजार चार्जर आणि मध्यम वेगवान चार्जर ५०० अशी एकूण १५ हजार ५०० चार्जिंग पायाभूत सुविधेसाठी अंदाजे ४० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्याकरिता महावितरणमार्फत अद्ययावत वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.

महावितरणने आपल्या उपकेंद्रातील अतिरिक्त जागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे. महावितरणमार्फत प्रस्तावित अतिरिक्त ४९ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यात नवी मुंबई १०, ठाणे ६, नाशिक २, औरंगाबाद २, पुणे १७, सोलापूर २, नागपूर ६, कोल्हापूर २, अमरावती २ इत्यादींचा समावेश आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ मध्ये जाहीर केले. त्यानुसार २०२५ पर्यंत राज्यातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा मुंबई शहर १ हजार ५००, पुणे ५००, नागपूर १५०, नाशिक १००, औरंगाबाद ७५, अमरावती ३० आणि सोलापूर २० अशी एकूण २ हजार ३७५ सज्ज करण्यात येत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे महामार्ग पूर्णत: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहेत.

महावितरणकडून पॉवर ॲप
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती आणि भौगोलिक निर्देशांकाची माहिती प्रदान करण्यासाठी महावितरणने ‘पॉवर ॲप’ नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती (उपलब्ध किंवा वापरात आहे), स्टेशन वर्णन, प्लग टाईप, शक्ती (डीसी-एसी), सुरू करण्याची वेळ, उपलब्ध वेळ (अॅपद्वारे बुकिंग), सद्य स्थळापासूनचे अंतर, चालू स्थळावरून जवळचे स्टेशन, सर्व्हिसमध्ये नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास जवळचे पर्यायी चार्जिंग स्टेशन इत्यादी माहिती त्यात उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07098 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top