राज्यात ‘बीए ५’ व्हेरिएंटचे आणखी सहा रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात ‘बीए ५’ व्हेरिएंटचे आणखी सहा रुग्ण
राज्यात ‘बीए ५’ व्हेरिएंटचे आणखी सहा रुग्ण

राज्यात ‘बीए ५’ व्हेरिएंटचे आणखी सहा रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : पुण्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि नागपूरची भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्या ताज्या अहवालानुसार बुधवारी ‘बीए ५’ व्हेरिएंटचे सहा रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी पाच पुण्यातील आहेत. एक रुग्ण नागपूरमध्ये आढळला आहे. त्यांपैकी पाच महिला आणि एक पुरुष आहे. तीन रुग्ण २० ते ३५ वर्षे वयोगटातील आहेत. उर्वरित तिघे ५० वर्षे वयापेक्षा अधिक वयोगटातील आहेत. सर्व रुग्ण ६ ते १२ जूनदरम्यानचे कोविड बाधित आहेत.

सहापैकी पाच रुग्णांचे लसीकरण झालेले आहे. सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘बीए ४’ आणि ‘बीए ५’ रुग्णांची संख्या २५ झाली आहे. त्यापैकी पुण्यात १५, मुंबईत ५, नागपूरमध्ये ३ आणि ठाण्यात २ रुग्ण आढळले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07103 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top