डीएसएम परीक्षा होणार केवळ रविवारीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीएसएम परीक्षा होणार केवळ रविवारीच
डीएसएम परीक्षा होणार केवळ रविवारीच

डीएसएम परीक्षा होणार केवळ रविवारीच

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये नियमित असलेल्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली शाळा व्यवस्थापन पदविका (डीएसएम) परीक्षा आता केवळ रविवारीच घेतली जाणार आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

डीएसएम परीक्षा सुट्टीच्या दिवशी घेतली जावी अथवा त्या दिवशी शिक्षकांना विशेष रजा मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने केली होती. त्यामुळे २४ ते ३० जूनदरम्यान आयोजित करण्यात येणारी डीएसएम परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्याचे सुधारित वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. त्यानुसार ही परीक्षा आता २६ जून ते २४ जुलैदरम्यान येणाऱ्या एकूण सात रविवारी घेतली जाणार आहे. मुक्त विद्यापीठाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकाचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे. रविवारी परीक्षा होणार असल्याने शिक्षकांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07105 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top