मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांची गाळा गुंडाळण्यास सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांची
गाळा गुंडाळण्यास सुरुवात
मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांची गाळा गुंडाळण्यास सुरुवात

मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांची गाळा गुंडाळण्यास सुरुवात

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय अस्थिरतेच्या या वातावरणात अनेक मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. बहुतांश खासगी सचिव (पीएस), विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) प्रलंबित फायलींचा निपटारा करण्यात व्यस्त आहेत. सत्तांतर झाल्यास पुन्हा मंत्रालयाबाहेर फेकले जाण्याची धास्ती या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे चित्र आहे.
राज्यात दोन दिवसांपासून घडत असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमुळे आघाडी सरकार गडगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयावर झाला आहे. सरकारमधील तब्बल सहा मंत्री नॉट रिचेबल झाल्यामुळे त्यांच्या दालनात संभ्रमाचे वातावरण आहे. सरकार कोसळण्याच्या शक्यतेमुळे अनेक मंत्र्यांच्या दालनात प्रलंबित फायलींचा वेगाने निपटारा केला जात आहे. काही खासगी सचिवांनी कार्यालयातील वैयक्तिक कागदपत्रे, वस्तू तातडीने हलवण्यास सुरुवात केली आहे. सचिव पातळीवरची कामे करून घेण्यासाठी नागरिकांची मंत्रालयातही गडबडही सुरू होती.
----
अधिकाऱ्यांना भविष्याची चिंता
२०१४ मध्ये भाजप-सेना सरकार आल्यावर त्यापूर्वीच्या आघाडी सरकारमधील कर्मचारी, खासगी सचिव, ओएसडींना कार्यरत ठेऊ नका, असा फतवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला होता. त्यामुळे अनेक वर्षे मंत्रालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना मूळ खात्यात परत जावे लागले. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे अधिकारी मंत्रालयात परतले; मात्र अडीच वर्षांनंतर पुन्हा भाजपप्रणीत सरकार आल्यास पुन्हा मंत्रालयाबाहेर जावे लागेल काय, अशी चिंता या अधिकाऱ्यांना पडली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07108 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top