तुम्ही त्रिफळाचीत झालात, आता मैदान सोडा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्ही त्रिफळाचीत झालात, आता मैदान सोडा!
तुम्ही त्रिफळाचीत झालात, आता मैदान सोडा!

तुम्ही त्रिफळाचीत झालात, आता मैदान सोडा!

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : शिवसेनेतील बंड हे हिंदुत्वासाठी नसून केवळ राजकीय आहे. त्यासाठी पूर्णतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असून स्वतःच्या आमदारांच्या बंडामुळे ते त्रिफळाचीत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकदृष्ट्या तात्काळ मैदान सोडावे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्याच आमदारांना भेटण्यासाठी वेळ देत नव्हते. त्यामुळे आमदारांच्या मनात खदखद होती. त्याचा विस्फोट या बंडाच्या निमित्ताने झाला असून त्यासाठी सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असेही देशपांडे म्हणाले. शिवसेनेच्या आमदारांनी केलेले हे बंड हिंदुत्वासाठी नसून हे केवळ सत्तेसाठी केलेले राजकीय बंड आहे असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या आमदारांपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप दिले जात होते. मुख्यमंत्री असून शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती. याची तक्रार करण्यासाठी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते; मात्र ते भेट देत नसल्याचे अनेक आमदार सांगतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या आमदारांना न्याय देऊ शकले नाहीत, असेही देशपांडे म्हणाले.
---
अस्थिरतेचा मनसेला फायदा
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीवरदेखील होईल. शिवसेनेतील या अस्थिरतेचा फायदा मनसेला निश्चित होईल; मात्र या बंडावर मनसेची एकंदरीत भूमिका आणि निवडणुकीसाठीची रणनीती याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असेही देशपांडे म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07124 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top