
आयडॉल प्रवेशासाठी सज्ज;
मुंबई, ता. २३ : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) पदवी, पदवीधर आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी आयडॉलकडून प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून त्याचा कार्यक्रम दोन दिवसांच्या आता जाहीर केला जाणार आहे.
आयडॉलमध्ये दूरस्थ पद्धतीने पदवी-पदव्युत्तर आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची मागणी असते. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचे बहुतेक निकाल जाहीर झाल्यानंतर आयडॉलच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात कधी होईल याची प्रतीक्षा शेकडो विद्यार्थी करत होते. त्याच पार्श्वभूमीवर आयडॉलने यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सर्व प्रवेशाची तयारी केली आहे.
मागील वर्षी आयडॉलमध्ये १५ अभ्यासक्रमामध्ये ६४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा त्यात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी यासाठी आयडॉलकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07132 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..