आमचे आमदार हरवले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमचे आमदार हरवले!
आमचे आमदार हरवले!

आमचे आमदार हरवले!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : शिवसेनेतील आमदारांच्या बंडाळीने शिवसैनिक व पदाधिकारी पेटून उठले आहेत. भायखळ्यातील शिवसेनेचे उपशाखा अध्यक्ष अतुल जंगम यांनी चक्क आपले आमदार यामिनी जाधव या हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. आमच्या मतदारसंघरातील कामे खोळंबली आहेत, त्यामुळे आमच्या आमदारांना लवकर शोधून आणा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अतुल जंगम यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आम्ही कार्यरत असलेल्या भायखळा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या यामिनी जाधव या आमदार आहेत; मात्र आमच्या विभागातील आमदार सध्या सापडत नाहीत. यावरून आमची ठाम समजूत झाली आहे, की आमच्या आमदार हरवल्या आहेत. त्यामुळे त्यांना शोधून आणा. सध्या पाऊस सुरू झाला आहे, लोकांच्या अनेक समस्या आहेत. अनेक नागरिक आपल्या समस्या आमच्याकडे घेऊन येत आहेत, पण आमचे आमदारच आम्हाला उपलब्ध होत नाहीत. आमचे आमदार आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत त्यासाठी आपण त्यांचा शोध घ्यावा व ते जेथे असतील तेथून त्यांना भायखळा विधानसभा मतदार संघातील त्यांच्या राहत्या घरी आणून सोडावे, अशी विनंती या तक्रारीत पोलिसांना ही केली आहे.

जाधव यांचे बॅनर फाडले
शिवसेनेच्या वतीने जंगम ही तक्रार आग्रीपाडा पोलिस ठाण्यात देण्यासाठी गेले असता पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी ही तक्रार पोलिस मुख्यालयाकडे दाखल केली आहे. या वेळी यामिनी जाधव आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांचे बॅनरदेखील फाडण्यात आले. बंडखोर आमदार आज ना उद्या परत मतदार संघात येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना मतदारसंघात पाय न ठेवू देण्याचा निर्णय शिवसैनिकांनी घेतला असल्याचेही जंगम म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07173 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..