पदवी अभ्यासक्रमासाठी २.४१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदवी अभ्यासक्रमासाठी
२.४१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
पदवी अभ्यासक्रमासाठी २.४१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

पदवी अभ्यासक्रमासाठी २.४१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत सुमारे दोन लाख ४१ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी सहा लाख ४५ हजार २२८ अर्ज सादर केले आहेत.
मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया ९ जून ते २५ जूनपर्यंत राबवण्यात आली. यामध्ये विविध विद्याशाखांतील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्या शाखानिहाय वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा तीन लाख ८४ हजार ८३२, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा एक लाख ८३ हजार ५१३, मानव्य विद्याशाखा ७४ हजार ४२१ आणि आंतरविद्याशाखेसाठी दोन हजार ४६२ असे एकूण सहा लाख ४५ हजार २२८ एवढे अर्ज सादर करण्यात आले आहेत.
---

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07189 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..