कोरोनामुळे दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू
कोरोनामुळे दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू

कोरोनामुळे दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : कोरोनाचा मृत्युदर रोखण्यात पालिकेला यश आले असतानाच रोज होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत आता वाढ होऊ लागली आहे. सोमवारी कोरोनाबाधित पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत १९ हजार ६०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे; तर सोमवारी दिवसभरात १,०६२ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णसंख्या ११ लाख आठ हजार ४३३ वर पोहोचली आहे. दिवसभरात १,३०५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ७६ हजार ३५० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या १२,४७९ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07191 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top