मेट्रो-३ चे भुयारीकरणाचे काम पूर्णत्वाकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो-३ चे भुयारीकरणाचे काम पूर्णत्वाकडे
मेट्रो-३ चे भुयारीकरणाचे काम पूर्णत्वाकडे

मेट्रो-३ चे भुयारीकरणाचे काम पूर्णत्वाकडे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ४१ वा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. या कामामुळे मेट्रो-३ प्रकल्पाचे भुयारीकरणाचे एकूण ९८.६० टक्के काम पूर्ण झाले आहे; तर महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल या मार्गावरील अप लाईनचे काम वेगाने सुरू असून ते ऑक्टोबर महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे.
मेट्रो-३ प्रकल्प भुयारी प्रकल्प असून या मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प २०२० मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र अद्यापही या मार्गाच्या कारशेडचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे प्रकल्पाची डेडलाईन वाढत चालली आहे. या मार्गावरील भुयारीकरणासह इतर कामे वेगाने सुरू आहेत. या मार्गाच्या भुयारीकरणाचे ९८.६० टक्के काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी (ता. २८) मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ४१ वा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला.
तानसा-२ या रॉबिन्स बनावटीच्या टनेल बोरिंग मशीनद्वारे महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक हा डाऊन-लाईन मार्गाचा ८३२.५ मीटर भुयारीकरणाचा टप्पा ५५५ रिंग्सच्या साह्याने २६२ दिवसांत पूर्ण करण्यात आला.
मेट्रो- ३ मार्गिकेतील पॅकेज-३ मध्ये पाच स्थानके असून हा या मार्गिकेतील सर्वांत लांब टप्पा आहे. या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत या पॅकेजअंतर्गत पाच भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. यामध्ये सायन्स म्युझियम ते वरळी अप लाईन- २०७२ मीटर, डाऊन लाईन २०५७ मीटर, सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी अप लाईन १११७.५ मीटर, डाऊन लाईन ११३५.५ मीटर आणि महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल डाऊन लाईन ८३२.५ मीटर या मार्गांचा समावेश आहे; तर महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल अप लाईन मार्गाचे काम अंतिम टप्यात असून हे काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
...
कुलाबा ते सीप्झपर्यंत मेट्रो-३ कॉरिडॉरचे संपूर्ण डाऊनलाईन भुयार पूर्ण झाले आहे. आणखी एक टप्पा लाईन तीनच्या १०० टक्के भुयारीकरणाच्या पूर्णतेच्या प्रतीक्षेत आहे.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07203 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..