म्हाडाच्या मास्टर लिस्टला पुन्हा स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाच्या मास्टर लिस्टला पुन्हा स्थगिती
म्हाडाच्या मास्टर लिस्टला पुन्हा स्थगिती

म्हाडाच्या मास्टर लिस्टला पुन्हा स्थगिती

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मास्टर लिस्टच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या घरेवाटपास गृहनिर्माण विभागाने स्थगिती दिली आहे. संक्रमण शिबिरातील गाळेवाटपही थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आकस्मिक व तातडीच्या प्रसंगी गाळेवाटप करावयाचे झाल्यास त्यासाठी सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे.

मूळ उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होऊ शकत नसल्याने संक्रमण शिबिरातील नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी मंडळाकडून मास्टर लिस्ट जाहीर करण्यात येते. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणारी घरे मास्टर लिस्टच्या माध्यमातून देण्यात येतात. मात्र, गैरप्रकाराच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्याने गृहनिर्माण विभागाने गेल्या वर्षी मास्टर लिस्टला स्थगिती दिली होती. स्थगिती उठवण्याची मागणी झाल्याने गृहनिर्माण विभागाने निर्णय मागे घेतला होता. त्यानुसार नागरिकांना मास्टर लिस्टनुसार घरे देण्यासाठी मंडळाने अर्ज मागवले होते.
मास्टर लिस्टसाठी मंडळाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. अर्जदारांची सुनावणी घेऊन घरेवाटप करण्याची प्रक्रिया मंडळाकडून सुरू करण्यात येणार होती. मात्र, त्याच वेळी गृहनिर्माण विभागाने मास्टर लिस्ट आणि संक्रमण शिबिराच्या घरेवाटपास स्थगिती दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07224 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..