मुंबईत पावसाचा जोर वाढतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत पावसाचा जोर वाढतोय
मुंबईत पावसाचा जोर वाढतोय

मुंबईत पावसाचा जोर वाढतोय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : बुधवारी मुंबईत पावसाचा बऱ्यापैकी जोर वाढलेला दिसला. कुलाबा, भायखळा, घाटकोपर, चेंबूर आदी परिसरात चांगला पाऊस झाला. मागील २४ तासांत मुंबईत ५२.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. मुंबईत मंगळवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी पावसाने जोर पकडल्याचे दिसले. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांना पावसाने झोडपून काढले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर आणि काही सोसायट्यांच्या बाहेर पाणी साचले. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली; तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. कोकणासह मुंबईत पावसाची संततधार सुरू राहणार असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शिवाय किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यतादेखील वर्तवली आहे. बुधवारी कुलाबा १५; तर सांताक्रूझ १२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून दिवसभरात मुंबईत १३.७ मि.मी. पाऊस झाला.

विभागवार पाऊस (मि.मी. मध्ये)
भायखळा- १४
घाटकोपर- ६.६
सीएसएमटी- ११.५
जुहू- ७
माटुंगा- ०.५
अंधेरी- ८
सायन- ०.५
चेंबूर- १५
विद्याविहार- २

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07239 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..