पालिका विद्यार्थ्यांना अद्याप रेनकोट, बूट वाटप नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका विद्यार्थ्यांना अद्याप रेनकोट, बूट वाटप नाही
पालिका विद्यार्थ्यांना अद्याप रेनकोट, बूट वाटप नाही

पालिका विद्यार्थ्यांना अद्याप रेनकोट, बूट वाटप नाही

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : जून महिना सरला, पाऊस सुरू आहे तरीदेखील मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप रेनकोट आणि बूट देण्यात आलेले नाहीत. पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली असली तरी ठेकेदाराला अजून वर्कऑर्डर मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना भिजत शाळा गाठावी लागत आहे. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईत पालिकेच्या साधारणतः नऊ माध्यमांच्या ९६३ शाळा आहेत. त्यात २० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील २४३ शाळा प्राथमिक आहेत. या विद्यार्थ्यांना दरवर्षी पालिकेकडून रेनकोट, बूट आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप होत असते. शैक्षणिक साहित्याचे वाटप पालिकेने सुरू केले असले तरी पावसापासून संरक्षणासाठी आवश्यक रेनकोट आणि बूट यांचे वाटप झालेले नाही. पालिका शिक्षण विभागाकडून पावसाळ्याच्या दोन महिने अगोदर निविदा प्रक्रिया राबवली जाते. यंदा मात्र निविदा प्रक्रिया राबवण्यास उशीर झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया राबवण्यात आली तरी ठेकेदाराला अद्याप वर्कऑर्डर देण्यात आलेली नाही. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका पालिकेतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना बसत आहे.

निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ बूट व रेनकोट पुरवण्यास सांगितल्याचे कळते. याबाबत सहआयुक्तांकडे नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीतही ठेकेदाराने इतक्या लवकर साहित्याची पूर्तता करणे शक्य नसल्याचे सांगत ४५ दिवसांचा अवधी मागितला. यावरून अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला झापल्याचेही सांगितले जाते; मात्र निविदा प्रक्रिया राबवण्यास उशीर का झाला, याबाबत विचारले असता शिक्षण विभागातील कुणाही अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
...
पालिका विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालिका प्रशासनाचा उदासीन दृष्टिकोन आहे. केवळ काही लाभार्थ्यांना फायदा पोचवण्यासाठी निविदा प्रक्रियेत दिरंगाई केली जाते.
- प्रभाकर शिंदे, माजी गटनेते, भाजप

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07242 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..