बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना विमा कायद्यांतर्गत लाभ आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना विमा कायद्यांतर्गत लाभ आवश्यक
बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना विमा कायद्यांतर्गत लाभ आवश्यक

बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना विमा कायद्यांतर्गत लाभ आवश्यक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व्यावसायिक संस्था असून क्रिकेट सामन्याचे आयोजन करून नफा कमावते, त्यामुळे बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना राज्य विमा (ईएसआय) कायद्यांतर्गत लाभ मिळणे आवश्यक आहे, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
बीसीसीआय ही केंद्राच्या अखत्यारित असलेली स्वायत्त संस्था असल्यामुळे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) अंतर्गतही सेवा देण्यास बांधील आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील ईएसआय न्यायालयाने वर्षाच्या सुरुवातीला आदेश देत बीसीसीआयमधील कर्मचारी हे दुकान आणि आस्थापना कायद्यात राज्य विमा (ईएसआय) कायद्यांतर्गत लाभ मिळण्यास पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाविरोधात बीसीसीआयने उच्च न्यायालयात याचिका केली होती. यावर नुकतीच न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी झाली.

बीसीसीआय ही मुख्यत्वे प्रशासकीय संस्था आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका, इंडियन प्रीमियर लीग, क्रिकेट सामन्यांचे प्रसारण, प्रायोजकत्व, तिकिटांची विक्री इत्यादींचे अधिकार विकून ते व्यावसायिक पद्धतीने नफा मिळवतात. त्यामुळे ही व्यावसायिक संस्था असल्‍याचे न्यायालयाने स्पष्ट करत ईएसआय न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यासाठी न्यायालयाने आदेशांचे अंमलबजावणीला सहा आठवड्यांची स्थगिती दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07259 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..