
हैनी बाबूच्या जामिनावर भूमिका स्पष्ट करा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी हैनी बाबूच्या जामिनावर ८ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज एनआयएला दिले आहेत. तसेच भूमिका स्पष्ट करण्यासाठी हा अखेरचा अवधी आहे, असेदेखील सुनावण्यात आले आहे.
प्रा. बाबू दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असून, त्यांना मागील वर्षी अटक केली आहे. यापूर्वी जूनमध्ये झालेल्या सुनावणीमध्ये एनआयएने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी मागितला होता. मात्र, अद्यापही प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. न्या. नितीन जामदार आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने याबाबत एनआयएला ताकीद दिली आहे. दरम्यान, एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी कवी वर्वरा राव यांनी सर्वोच्च न्यायालयात वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात १२ जुलै रोजी त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07260 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..