डॉक्टर्स दिनानिमित्त विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टर्स दिनानिमित्त विविध उपक्रम
डॉक्टर्स दिनानिमित्त विविध उपक्रम

डॉक्टर्स दिनानिमित्त विविध उपक्रम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१ : डॉक्टर रुग्णांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही वोक्हार्ट रुग्णालयाने ‘डॉक्टर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरा रोडच्या वतीने या महामारीच्या काळात रुग्णसेवेसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टरांसाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टरांनीही याठिकाणी आयोजित उपक्रमांमध्ये भाग घेत आनंदाचे क्षण साजरे केले. रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांनी आतापर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले.

डॉक्टर्स स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांचा मोलाचा वेळ देतात व त्यांचे संपूर्ण जीवन समर्पित करतात. डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांना तणावमुक्त करण्यात मदत करत, एकत्र येऊन आनंदाचे क्षण घालविण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. फॅशन शो, डान्स, मनोरंजनात्मक खेळ, केक कटिंग तसेच अल्‍पोपाहाराचे आयोजन केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07268 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..